राज्यात गुन्हेगारी, बेरोजगारी असे अनेक प्रश्न असून सरकार केवळ घोषणाबाजीच करत आहे, अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज विधानभवनाच्या परिसरात वार्ताहरांशी बोलताना केली.
राज्यपालांच्या आजच्या अभिभाषणात एकही नवा मुद्दा नव्हता, असं पटोले म्हणाले. राज्यात महिला सुरक्षित नाहीत, उद्योगधंदे राज्याबाहेर चालले आहेत, शहरीकरण मोठ्या प्रमाणात होत असून ग्रामीण भाग ओसाड पडत आहे, अशी टीका त्यांनी केली.