छोटे व्यापारी आणि सर्वसामान्य जनतेवरचा करांचा बोजा कमी करण्यासाठी वस्तू आणि सेवा कराचं नवीन प्रारूप येत्या अर्थसंकल्पात लागू करावं अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस सचिन पायलट यांनी केली आहे. मुंबईत गांधी भवन इथं ते आज वार्ताहरांशी बोलत होते.
भाजपा सरकार अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे चित्र निर्माण करत आहे पण खरी परिस्थिती वेगळी आहे. सरकारला योग्य वाटतील तेच आकडे जाहीर केले जात आहेत. उलट काँग्रेस सरकार असताना मात्र वस्तुस्थिती मांडली जात होती, असं ते म्हणाले.