केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाच्यावतीनं नवी दिल्लीत भारत मंडपम इथं प्रधानमंत्री जनमन परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जुएल ओराम आणि राज्यमंत्री दुर्गादास उईके हे या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री जनमन अभियानाचा उद्देश शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणं हा असून, एकंदर सहा क्षेत्रांवर भर देण्यात आला आहे. या परिषदेत देशातल्या १८ राज्यातले ८८ आदिवासी बहुल जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी चर्चेत भाग घेणार असून, अजूनही विकासापासून वंचित राहिलेल्या मागास जिल्ह्यांच्या विकासासाठी एक कृती आराखडा तयार केला जाणार आहे.
Site Admin | January 21, 2025 3:33 PM | PM JANMAN
आदिवासी बहुल प्रदेशातल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रधानमंत्री जनमन परिषदेचं आयोजन
