डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मुंबईत फौजदारी न्याय व्यवस्थेच्या प्रशासनात भारताचा प्रगतीशील मार्ग” विषयावर परिषद

“भारतीय न्याय संहिता 2023”, “भारतीय साक्ष अधिनियम, 2023”, आणि “भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023” हे तीन नवीन फौजदारी कायदे 1 जुलै 2024 पासून  देशभर लागू होणार आहेत. या कायद्यांची माहिती सर्वसामान्यांना व्हावी, यासाठी केंद्रीय विधी आणि  न्याय मंत्रालयानं उद्या मुंबईतल्या वरळी इथल्या एनएससीआय सभागृह इथं “ फौजदारी न्याय व्यवस्थेच्या प्रशासनात भारताचा प्रगतीशील मार्ग” या विषयावर परिषदेचं  आयोजन केलं  आहे.

या परिषदेचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कायदा आणि  न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या उपस्थितीत होणार आहे. 

या परिषदेला विविध उच्च न्यायालयं , जिल्हा आणि कनिष्ठ न्यायालयांचे न्यायाधीश, माजी न्यायाधीश, वकील, पोलीस, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा