सांख्यिकी आणि योजना अंमलबजावणी मंत्रालयानं नवी दिल्लीत केंद्र आणि राज्य स्तरावरील सांख्यिकी संघटनांची परिषद आयोजित केली होती. काल समारोप झालेल्या या परिषदेत निर्णयप्रक्रियेसाठी माहितीचा उपयोग आणी सरकारी सांख्यिकी यंत्रणेचं सक्षमीकरण याविषयी विचारविनिमय करण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारांच्या विविध विभागांमधल्या समान उद्दीष्टांवर दोन दिवसांच्या या परिषदेत व्यापक चर्चा झाल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. 30 केंद्रिय मंत्रालयं, राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश, भारतीय रिझर्व्ह बँक, भारतीय सांख्यिकी संस्था यांच्यासह अन्य संस्ता संघटनांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले होते.
Site Admin | August 14, 2024 9:51 AM