भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त कामेश्वर चौपाल यांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. चौपाल हे समर्पित रामभक्त होते, ज्यांनी अयोध्येतल्या राम मंदिराच्या उभारणीत मोलाचं योगदान दिलं. समाजाच्या वंचित घटकाच्या कल्याणासाठी केलेल्या कामामुळे ते सदैव स्मरणात राहतील, असं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.