बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ इथल्या राज्यस्तरीय कृषीमहोत्सवाचा आज समारोप झाला. २१ ऑगस्टला सुरु झालेल्या राज्यस्तरीय कृषीप्रदर्शनाला मागील सहा दिवसात सुमारे साडेचार लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी भेट दिली. या महोत्सवात अत्याधुनिक कृषी अवजारांचे प्रदर्शन, धान्य महोत्सव, स्वयंसहाय्यता महिला बचतगटांच्या वस्तूंचे प्रदर्शन आणि थेट विक्री अशा अनेक उपक्रमांचं आयोजन केलं होतं. या ठिकाणी असणाऱ्या विविध प्रकारच्या ४३५ स्टॉल्समधून सुमारे तीन कोटींपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल झाल्याची माहिती बीड जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिली.
Site Admin | August 26, 2024 7:06 PM | #कृषीमहोत्सव #समारोप | #बीड
बीड इथं आयोजित राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचा समारोप
