यूनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सी या पॅलेस्टाईन निर्वासितांसाठी काम करणाऱ्या संघटनेनं गाझा मध्ये पोलिओ चा उद्रेक होण्याची चिंता व्यक्त केली आहे. पोलिओ लसीचा अपुरा पुरवठा आणि शीत साखळीचा अभाव यामुळे तिथल्या बालकांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. महिना अखेरीस गाझा मधल्या १० वर्षां आतील ६ लाख ४० हजारांहून अधिक बालकांसाठी २ टप्प्यात लसीकरण मोहीम राबवण्यात येईल अशी माहिती संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस एंटोनिओ गुटेरस यांनी दिली.
Site Admin | August 24, 2024 2:55 PM | उद्रेक | गाझा | पोलिओ