जागतिक पातळीवर एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराची स्पर्धा तीव्र होत असून भारताने यासंबंधात व्यापक धोरण आखल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज ओपन एआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांची नवी दिल्लीत भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. एआय संदर्भातलं पुढचं धोरण तयार करण्याच्या मुद्द्यावर ऑल्टमन यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असून ऑल्टमन यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या तंत्रज्ञानविषयक धोरणाचं कौतुक केलं आहे, असं वैष्णव यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात सांगितलं.
Site Admin | February 5, 2025 8:21 PM | Ashwini Vaishnav
जागतिक पातळीवर एआयच्या वापराची स्पर्धा तीव्र होत असून भारताने यासंबंधात व्यापक धोरण आखणार – मंत्री अश्विनी वैष्णव
