डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 16, 2024 10:10 AM | India | SRILANKA

printer

अर्थव्यवस्था, सुरक्षेमध्ये भारत-श्रीलंका भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी वचनबद्ध – श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष

केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबतची चर्चा यशस्वी झाल्याचं श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष दिस्सानायके यांनी म्हटलं आहे. भारत श्रीलंका आर्थिक सहकार्य वाढवणं, गुंतवणुकीच्या संधींना प्रोत्साहन देणं, क्षेत्रिय सुरक्षा मजबूज करणं आणि पर्यटन, उर्जा यासारख्या क्षेत्रांचं आधुनिकीकरण याविषयी प्रामुख्यानं चर्चा झाल्याचं दिस्सानायके यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. यामुळे दोन्ही देशांमधली भागीदारी सुदृढ करण्याप्रती दोन्ही देशांची वचनबद्धता पुन्हा निश्चित झाली असंही त्यांनी म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा