शिक्षण क्षेत्रात झालेल्या बाजारीकरणामुळे शिक्षणाच्या दर्जावर विपरीत परिणाम होत असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. राजस्थान मधल्या सीकर इथल्या कार्यक्रमात ते बोलत होते. शिक्षण हे कधीच उत्पन्नाचं साधन नव्हतं, तर ते त्यागाचं, परोपकाराचं आणि समाज सक्षम घडवण्याचं माध्यम होतं. शिक्षण क्षेत्राचा व्यवसाय होणं, हे राष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टीनं पोषक नसल्याचं धनखड यावेळी म्हणाले. शिक्षण ही बाब एखाद्या वस्तूसारखी नफेखोरीसाठी विकली जात असून त्याचा शिक्षणाच्या गुणवत्तेवर दुष्परिणाम होत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.
Site Admin | October 19, 2024 8:03 PM | Vice President Jagdeep Dhankhar