देशानं गेल्या काही वर्षात निर्माण केलेल्या विश्वासामुळे भारत हा विकासाचं इंजिन ठरत आहे, असं प्रतिपादन वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयुष गोयल यांनी केलं. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अर्थात फिक्की च्या ९७ वाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एका सत्राला ते आज संबोधित करत होते. भारत आणि भारताचा व्यापार हा जागतिक मूल्य साखळीचा एक अग्रेसर भाग बनत आहे आणि जागतिक व्यापार सहकार्यामध्ये विश्वासू भागीदार ठरत आहे. सर्व उद्योग प्रतिनिधींनी नाविन्यपूर्ण आणि संशोधनास पूरक पर्यावरण विकसित करण्यासाठी प्रयत्नशील राहावं असं गोयल म्हणाले.
Site Admin | November 21, 2024 7:52 PM | Minister Piyush Goyal
देशानं गेल्या काही वर्षात निर्माण केलेल्या विश्वासामुळे भारत हा विकासाचं इंजिन ठरत आहे – पीयुष गोयल
