डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 27, 2025 1:45 PM | Colombia | US

printer

कोलंबियावरच्या आयात शुल्काला विराम देण्याचा अमेरिकेचा निर्णय

कोलंबियावरच्या आयात शुल्काला विराम देण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. अमेरिकेतून येणाऱ्या निर्वासितांच्या विमानांना कोलंबियात उतरण्यासाठी राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी सहमती दिल्यानंतर हा निर्णय घेतल्याचं व्हाईट हाऊसतर्फे जारी झालेल्या निवेदनात म्हटलं आहे. पेट्रो यांनी अमेरिकेहून येणाऱ्या निर्वासितांच्या स्थलांतराला विरोध केला होता. प्रत्युत्तरादाखल डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलंबियाच्या आयातीवर २५ टक्के शुल्क लादलं आणि आगामी काळात ते ५० टक्के करण्याचा इशारा दिला. त्यामुळे दोन्ही देशांमधल्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा