डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

नांदेड जिल्ह्यात किनवट इथं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते संपूर्णता अभियानाचा प्रारंभ

नांदेड जिल्ह्यात किनवट इथं आज नीती आयोगाच्या आकांक्षीत तालुका कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते संपूर्णता अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. आकांक्षी तालुका कार्यक्रमांतर्गत सर्व निकष ऑगस्टअखेर पूर्ण केले जातील, असं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी सांगितलं.
धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातही जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर या तीन महिन्यात संपूर्णता अभियान राबवलं जाणार आहे त्याचं उद्घाटन उद्या परंडा येथे होत आहे या अभियानाविषयी धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितलं…

सर्वाधिक वाचले

सर्व पहा