गेले काही दिवस उकाडा जाणवत असताना कालपासून राज्यात थंडीचं पुनरागमन झालं आहे. अरबी समुद्रावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ढगाळ हवामान तयार होऊन अवकाळी पाऊस पडला तसंच तापमानात वाढ झाली होती. मात्र, उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे मुंबईसह नाशिक, पुणे इत्यादी भागात थंडीचा जोर वाढला आहे. मुंबईतील सांताक्रुज केंद्रावर तापमान १३ पूर्णांक ७ दशांश अंश सेल्सिअस, नाशिक शहरात ९ पूर्णांक ४ दशांश तर निफाडमध्ये ६ पूर्णांक ७ दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. येत्या काळात तापमान आणखी कमी होईल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
Site Admin | December 9, 2024 4:11 PM | Maharashtra | Weather Update