राज्यात थंडीची कडाका वाढत असून बऱ्याचं ठिकाणी तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. परभणी जिल्ह्यात आज सर्वाधिक कमी ८ अंंश सेल्सिअस तापमानाची नोंद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामान विभागानं केली आहे.
अमरावती शहरात देखील पारा १२ अंश सेल्सिअस पर्यंत तर धारणी-चिखलदऱ्यात पहाटे पारा ९ अं.से. पर्यंत घसरलाय. हवामान खात्यानं येत्या तीन दिवसात काही जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे.