आज पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पश्चिम राजस्थानच्या काही भागात थंडीची लाट राहील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तरेकडील, पूर्वेकडील आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पुढील 2 दिवस सकाळी आणि रात्री दाट धुकं राहील. हवामान खात्याने उद्यापर्यंत अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील 2 दिवसांत वायव्य, मध्य आणि पश्चिम भारतात किमान तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे