डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 9, 2025 1:42 PM

printer

उत्तर भारतात थंडीची लाट आणखी तीव्र

उत्तर भारताच्या बहुतेक सर्व भागात थंडीची लाट आणखी तीव्र झाली आहे. या ठिकाणी तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पश्चिमेकडच्या वाऱ्यांमुळे आठवड्याच्या उत्तरार्धात वायव्य भारताच्या काही भागात पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. 

 

हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादमध्ये पुढले  दोन दिवस थंडीची लाट कायम राहील, तर पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये उद्यापर्यंत दाट ते अती दाट धुकं राहील. देशाच्या वायव्य भागात  उद्यापर्यंत किमान तापमानात सुमारे 2 अंश सेल्सिअस घट  होईल, आणि त्यानंतर हळूहळू २ ते ४ अंशानं वाढ होईल,  असा  हवामान विभागाचा अंदाज आहे. 

दाट धुक्यामुळे संपूर्ण उत्तर भारतात रेल्वे आणि विमानसेवा विस्कळीत झाली असून दिल्लीकडे जाणाऱ्या जवळजवळ  25 गाड्या तीन ते चार तास उशिरा धावत आहेत. 

जम्मू-काश्मीरमध्ये उद्यापर्यंत हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. काश्मीर आणि जम्मू च्या डोंगराळ भागात थंडीची लाट कायम आहे, काश्मीर मध्ये तापमान गोठणबिंदूच्या जवळ आहे, तर लडाख च्या विविध भागात गोठणबिंदूच्या वर आहे.

 

हिमाचल प्रदेशाच्या डोंगराळ भागात कोवळ्या उन्हामुळे वातावरण आल्हाददायक झालं आहे, तर मैदानी भागात दाट धुक्याचा थर पसरला आहे. राज्यात पुढले दोन दिवस हिमवर्षाव आणि पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 

 

राजस्थानमध्ये आजपासून पावसाची शक्यता असून १० आणि  ११ जानेवारी रोजी बिकानेर, जयपूर, भरतपूर, आणि अजमेरच्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.  

 

छत्तीसगडमध्ये थंडीची लाट आणखी तीव्र झाली असून, उद्यापर्यंत ती कायम राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा