देशाच्या एकूण कोळसा उत्पादनात या वर्षी आतापर्यंत 7.12 टक्के इतकी लक्षणीय वाढ नोंदवल्याचं कोळसा मंत्रालयानं काल जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.25 ऑगस्टपर्यंत नोंदवण्यात आलेल्या आर्थिक वर्षात देशाचं एकत्रित कोळसा उत्पादन वाढून 370 दशलक्ष टन झालं आहे, जे गेल्या वर्षी याच कालावधीत 346 दशलक्ष टन इतकं होतं.तसंच कोळशाच्या वितरणातही लक्षणीय वाढ झाली असून यावर्षी 25 ऑगस्टपर्यंतचं वितरण 397 दशलक्ष टनांवर पोहोचलं आहे. मंत्रालयाने पुढे सांगितले की, मागील गेल्या वर्षीच्या 376 दशलक्ष टन वितरणाच्या तुलनेत आत्ता 5.48 टक्के इतकी उल्लेखनीय वाढ वितरणात दिसत आहे,असंही कोळसा मंत्रालयानं म्हटलं आहे.
Site Admin | August 28, 2024 10:17 AM | Coal production