कोळसा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कंपन्यांच्या समाजिक जबाबदारी उपक्रमांचा सहामाही आढावा घेण्यासाठी काल कोळसा मंत्रालयातर्फे नवी दिल्ली इथं एक बैठक घेण्यात आली. या उपक्रमांचा समुदायांवर पडणारा त्यांचा प्रभाव आणि सरकारच्या मार्गदर्शक तत्वांशी सुसंगतता या मुद्यांवर त्यांच्या प्रगतीचं मूल्यांकन करण्यात आलं. आरोग्यसेवा, शिक्षण, पर्यावरण, कौशल्य विकास आणि उपजीविका यांसारख्या क्षेत्रातील प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यात आली. कोळसा खाणींच्या क्षेत्रात राहणाऱ्या स्थानिक लोकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करून खात्रीशीर परिणाम देणाऱ्या उपक्रमांच्या जलद अंमलबजावणीच्या गरजेवर मंत्रालयानं भर दिला.
Site Admin | September 10, 2024 10:02 AM | Coal Ministry