देशातल्या कोळसा खाणींमधून गेल्या ८ महिन्यांत ११ कोटी २० लाख टन इतकं उत्पादन झाल्याची माहिती केंद्रीय कोळसा मंत्रालयाने दिली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या उत्पादनाच्या तुलनेत यंदा ३५ टक्क्यांची वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात त्यात आणखी १ कोटी ७० लाख टन कोळशाची भर पडली आहे. देशांतर्गत उर्जा निर्मितीला प्राधान्य देऊन सरकार भारताला पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने पुढे घेऊन जात असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातल्या विकसित भारत २०४७ मधलं ते पुढचं पाऊल आहे, असं मंत्रालयाने म्हटलं आहे.
Site Admin | December 2, 2024 2:45 PM | Coal Mines