डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विद्यार्थ्यांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याबद्दल कोचिंग क्लासेसना दंड

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने आय आय टी – जे इ इ , नीट आणि इतर स्पर्धापरीक्षांचं प्रशिक्षण देणाऱ्या काही कोचिंग क्लासेसना विद्यार्थ्यांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्याबद्दल नोटीस बजावली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या स्पर्धा परीक्षांच्या निकालांनंतर प्रसिद्ध झालेल्या कोचिंग क्लासेसच्या जाहिरातींमध्ये ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत येणाऱ्या नियमांचं पालन केलं नसल्याचं प्राधिकरणाला आढळून आल्यामुळे या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
कोचिंग क्लासेसनी आपल्या जाहिरातींमध्ये परीक्षेत यशाची खात्री देणारी किंवा नोकरी मिळवून देण्याची आश्वासने देऊ नयेत, सर्व अटी आणि शर्ती ठळकपणे छापाव्यात आणि जाहिरातीत छापल्याप्रमाणे सर्व आश्वासनं पाळावीत अशा सूचना प्राधिकरणाने दिल्या आहेत.
गेल्या ३ वर्षांत प्राधिकरणाने नियमभंग करणाऱ्या २४ कोचिंग क्लासेसना ४९ नोटीसा बजावल्या असून ७७ लाखाहून अधिक दंड गोळा केला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा