डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्याचा विकास आणि नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

महाराष्ट्रातही सर्वत्र स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी  पुण्यातल्या राजभवनात राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. राज्यपालांनी उपस्थित लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. 

 

राज्य शासन  राज्याचा सर्वांगीण विकास आणि  नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.ते म्हणाले की, विविध योजनांच्या माध्यमातून विकासाला चालना देण्याचं काम सुरु आहे.  कृषि, शिक्षण, ऊर्जा, निर्मिती, माहिती तंत्रज्ञान, बांधकाम, पर्यटन, आरोग्य सुविधा, कौशल्य विकास,  पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा या क्षेत्रांमध्ये आपण आमूलाग्र क्रांती आणत आहोत. 

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात कालपासून रक्कम जमा होऊ लागली असून युवकांना रोजगारासाठी प्रशिक्षण,  विद्यावेतन, गोरगरीबांना, वर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर,  शेतकऱ्यांना वीजबिलात सवलत, मुलींना संपूर्ण व्यवसायिक शिक्षण मोफत अशा अनेक योजना सुरु केल्याचंही त्यांनी सांगितलं.यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी मान्यवर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर मध्ये ध्वजारोहण झालं. छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. याखेरीज राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमधे ध्वजवंदनेचे कार्यक्रम झाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा