नवी मुंबई विमानतळावर ४ टर्मिनलची उभारणी होणार असून या विमानतळावरून वर्षाला ९ कोटी लोक प्रवास करतील, तसंच २६ लाख टन कार्गो वाहतूक होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई पट्टीवर भारतीय हवाई दलाच्या C-295 विमानाचं यशस्वी चाचणी लँडिंग झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने विमानतळावरील इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीमच्या चाचण्या पूर्ण केल्यानंतर आज धावपट्टीची चाचणी करण्यात आली. यावेळी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सिडकोचे उपाध्यक्ष विजय सिंघल उपस्थित होते.