डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

लाडकी बहीण योजनेसह कोणत्याही कल्याणकारी योजना बंद होणार नाहीत, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

माझी लाडकी बहीण योजनेसह कोणत्याही कल्याणकारी योजना बंद होणार नाहीत अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. नांदेडमध्ये आयोजित महिला सशक्तीकरण अभियान मेळाव्यात ते बोलत होते. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने ३३ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे, त्यातले १७ हजार कोटी रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात पोचले आहेत. असं ते म्हणाले. आचारसंहितेमुळे दोन महिन्यांचे पैसे आगाऊ दिल्याचा उल्लेख करत लाडक्या बहिणींनी साथ दिली तर या योजनेतून दिल्या जाणाऱ्या पैशांमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ होईल अशी हमीसुद्धा यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. 

 

वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत शिक्षण अशा योजनांचा उल्लेख करत या योजना म्हणजे महिलांना कायमस्वरुपी ओवाळणी आहे असं त्यांनी सांगितलं. युवकांना भत्त्यासह प्रशिक्षण देणारं देशातलं महाराष्ट्र हे पहिलंच राज्य आहे असं ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा