मित्र अर्थात महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशनच्या नियामक मंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी झाली. यात राज्यात जिल्हास्तरीय विकासाला चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता बळकटीकरण प्रकल्प तसंच कृष्णा भिमा खोऱ्यातली पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पाला जागतिक बँकेकडून १ हजार ५६२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
‘मित्र’ ने कृषी, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, पायाभूत सुविधा, ऊर्जा या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करावं, मुंबईसह मुंबई महानगर परिसरातल्या पूरक बाबींवर लक्ष केंद्रित करावं, तसंच सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी संशोधकांनी प्रयत्न करण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.
यावेळी नीती आयोगाच्या धर्तीवर ‘मित्र’ने चार संस्थांशी नॉलेज पार्टनर म्हणून सामंजस्य करार केला.