राज्यात महायुतीचं सरकार आल्यावर पहिल्या शंभर दिवसांचं व्हिजन मांडत त्यानुसार काम करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज धारशिव इथल्या प्रचार सभेत सांगितलं. महायुतीचे धाराशिवचे उमेदवार अजित पिंगळे आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघातले उमेदवार राणा जगजित सिंह पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर राखत महागाई आटोक्यात ठेवू, २५ लाख रोजगार निर्मिती करू आणि लाडक्या बहिणींना एकवीशसे रुपयांच्या मदतीचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.
Site Admin | November 8, 2024 7:40 PM | CM Eknath Shinde
महायुती सत्तेत आल्यावर पहिल्या १०० दिवसांचं व्हिजन मांडत काम करणार – मुख्यमंत्री
