डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 25, 2024 8:23 PM | CM Eknath Shinde

printer

सेमीकंडक्टर क्षेत्रातील गुंतवणूकीमुळे महाराष्ट्र उद्योगस्नेही राज्य झालं आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उद्योग, पायाभूत सुविधा, परकीय गुंतवणूक क्षेत्रात महाराष्ट्र राज्य देशात अव्वल असून राज्यात सेमीकंडक्टर क्षेत्रातही मोठी गुंतवणूक होत आहे आणि यामुळे महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य झालं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. इंडिया टुडे कॉनक्लेव्ह २०२४ या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेण्यात आली. दावोसमध्ये झालेली गुंतवणूक, सौरऊर्जा, सेमीकंडक्टर इत्यादी क्षेत्रांमध्ये वाढती गुंतवणूक यामुळे उद्योजकांचा विश्वास वाढत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचं जाळं तयार होत आहे. वाढवण बंदर हा महाराष्ट्राचा कायापालट करणारा प्रकल्प आहे, तसंच तिथं विमानतळ सुरू करण्याचाही विचार आहे. नवी मुंबई विमानतळ लवकरच सुरू होणार आहे, असं त्यांनी नमूद केलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा