नवी मुंबईत कोळी बांधवांनी गरजेपोटी बांधलेली घरं नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अधिसूचना लवकरच जारी केली जाईल असं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नवी मुंबईतल्या ऐरोली इथं उभारण्यात येणाऱ्या कोळी भवनाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोळी भवनाचं भूमिपूजन झालं त्यावेळी ते बोलत होते. कोळी बांधव हे भूमिपुत्र असल्यामुळे त्यांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिलं जाईल असंही ते म्हणाले. राज्यात जे प्रकल्प होत आहेत त्यामध्ये कोळी बांधवांच अस्तित्व नाकारलं जाणार नाही, असं आश्वासनही त्यांनी दिलं.
नवी मुंबई शहराचा विकास करताना शहराच्या आणि भूमिपुत्रांच्या गरजा लक्षात घेऊन सरकार काम करणार आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं.