वर्षावास या पवित्र महिन्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी भंतेजींसाठी चिवरदान, धम्मदान आणि भोजनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला राज्यभरातून भिक्षु महासंघाचे भंतेजी आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर सामूहिक प्रार्थना झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते चिवरदान, वस्त्रदान करण्यात आलं. ऑल इंडिया भिक्षु संघाचे महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष भदंत डॉ. उपगुप्ता महाथेरो उपस्थित होते.
Site Admin | September 22, 2024 7:11 PM | CM Eknath Shinde
मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी भंतेजींसाठी चिवरदान, धम्मदान आणि भोजनाचा कार्यक्रम
