महायुतीचं सरकार महिला, शेतकरी, युवक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. धाराशिव जिल्ह्यात परांडा इथं मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमात आज ते बोलत होते. शासनानं सुरू केलेली लाडकी बहिण योजना यशस्वी झाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि आपण एकसंघपणे महिलांच्या कल्याणासाठी काम करत असल्याचं ते म्हणाले. ज्या महिलांच्या खात्यात अद्याप योजनेचे पैसे जमा झाले नाहीत, ते येत्या ३० सप्टेंबर पूर्वी जमा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. ही योजना थांबणार नसून दर महिन्याला महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. धाराशिव जिल्ह्याच्या हक्काचं पाणी उजनीतून सीन कोळेगाव प्रकल्पात आणण्यासाठी लवकरच बैठक घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं .
Site Admin | September 14, 2024 8:34 PM | CM Eknath Shinde
महायुतीचं सरकार महिला, शेतकरी, युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे, मुख्यमंत्र्यांची ग्वाही
