मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी राज्यभरात लाभार्थी कुटुंब भेट अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. राज्यात महायुतीला विजयी करण्यासाठी शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता दररोज १५ कुटुंबांची भेट घेऊन त्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे की नाही, हे तपासून तो मिळालेला नसल्यास याबाबतच्या अडचणी दूर करेल, त्या कुटुंबाला मार्गदर्शन करेल, माहिती देईल, असं शिंदे यांनी ठाण्यात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
Site Admin | September 10, 2024 6:48 PM | CM Eknath Shinde