आजच्या म्हणजेच २१ नोव्हेंबर रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ जणांनी हौतात्म्य पत्करले होते. त्यांच्या या हौतात्म्याचे स्मरण म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाला भेट देऊन शहीद हुतात्म्यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हेही उपस्थित होते.
राष्ट्रवादी शरद्चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हुताम्यांना आदरांजली वाहिली आहे. आपल्या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन!