मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भेटीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. लोकसभेत मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता, मात्र विधानसभेची निवडणूक मनसेने स्वबळावर लढवली होती. अलिकडेच राज ठाकरे यांनी विधानसभेत महायुतीला मिळालेल्या मतांवर शंकाही उपस्थित केली होती.
Site Admin | February 10, 2025 3:15 PM | CM Devendra Fadnavis | Raj Thackeray
मुख्यमंत्र्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
