डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पायाभूत सुविधा विकासात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पायाभूत सुविधा विकासात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून, देशात सर्वाधिक पायाभूत विकासाची कामं राज्यात सुरू आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं. राज्यात विविध ठिकाणी महारेलनं उभारलेल्या ७ उड्डाणपुलांचं नागपुरातून लोकार्पण करताना ते बोलत होते.

 

एका बाजूला केंद्र शासनाचे विविध प्रकल्प आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र शासनानं हाती घेतलेले विविध प्रकल्प यातून समृध्द महाराष्ट्र घडत आहे. येत्या काळात महारेल मार्फत २०० रेल्वे उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाची कामं पूर्ण केली जात आहेत. राज्यात मेट्रो, राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, विमानतळ विकास, बंदरांचा विकास अशा सर्व क्षेत्रात आपण दूरदृष्टी ठेवून विकास कामं हाती घेतली आहेत, असं ते म्हणाले. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा