पांडुरंगाच्या आशिवार्दानं एक मोठा विजय आम्हाला प्राप्त झाला असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आळंदी इथं भेट दिल्यानंतर व्यक्त केली. वारकरी विचारानंच आपला महाराष्ट्र पुढे गेला आहे, भविष्यातही पुढे जात राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. इंद्रायणी नदीचं पाणी शुद्धिकरणाचा कार्यक्रम सुरु केला आहे, तो युद्धपातळीवर पूर्ण करण्याचं आश्वासनही त्यांनी बातमीदारांशी बोलताना दिलं.
Site Admin | January 3, 2025 7:42 PM | CM Devendra Fadnavis | Maharashtra