डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सहाय्य योजनांचं अनुदान थेट बँक खात्यात वर्ग करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

शासनाच्या विशेष सहाय्य योजनांचं अनुदान DBT अर्थात थेट लाभ हस्तांतरण पोर्टलद्वारे पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यांत वर्ग करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरु करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईत सामाजिक न्याय, आदिवासी विभागाच्या पुढील शंभर दिवसांच्या आराखड्याचा  मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन आदी  योजनांच्या  अर्थसाहाय्याचं  वितरण या पोर्टल च्या माध्यमातून केलं जाणार आहे. विद्यार्थी-विद्यार्थिनींना सर्व सोई सुविधा वेळेवर मिळतील याची खात्री करावी, वसतीगृहाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करावी, जात पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन करावी, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी पोर्टल लवकरात लवकर सुरू करावं, अशा सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी या बैठकी दरम्यान  दिल्या. 

 

तसंच साखर गळीत हंगामात ऊस क्षेत्र, ऊस उत्पादन आणि ऊस उत्पादकता याचा अचूक अंदाज येण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, रिमोट सेन्सिंग अर्थात दूरस्थ संवेदन आणि भौगोलिक माहिती प्रणाली सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या. सहकार विभागाच्या पुढील १०० दिवसाच्या नियोजनाचा आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा