राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केली. राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सिडबी-स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाकडून स्टार्ट अपसाठी २०० कोटी रुपये तर प्रत्येक प्रादेशिक विभागाला ३० कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातील स्टार्टअप जगात पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत, असं कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले.
कार्यक्रमाला देशभरातील तंत्रज्ञान, कृषी, सेवा क्षेत्र, औषधनिर्माण तसेच पर्यटन अशा विविध क्षेत्रांतील १ हजार स्टार्टअप या कार्यक्रमात उपस्थित होते.