पक्षीय राजकारणापलिकडे जाऊन राज्याच्या हितासाठी काम करण्याची प्रेरणा महाराष्ट्रातल्या जुन्या पिढीच्या नेतृत्वाने दिली असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राज्याचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त आज चंद्रपूरमधे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विदर्भाच्या विकासाकरता कन्नमवार यांनी केलेल्या कार्याचा गौरव फडणवीस यांनी यावेळी केला.
Site Admin | January 10, 2025 3:04 PM | CM Devendra Fadnavis