डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

शासकीय रुग्णालयात दर्जेदार सेवा देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी अधिकाधिक दर्जेदार आणि अद्ययावत सेवा देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिल्या आहेत. औषधं तसंच अन्नपदार्थांमधल्या भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले. वैद्यकीय शिक्षण, अन्न आणि औषध प्रशासन तसंच सामान्य प्रशासन विभागाच्या पुढील 100 दिवसांच्या आराखड्याचा आढावा घेताना ते मुंबईत बोलत होते. 

दुध भेसळ रोखणे, मंदिर आणि देवस्थानातल्या प्रसादाची गुणवत्ता तपासणीची कामे प्राधान्याने करा असंही ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा