राज्याच्या ग्रामीण भागासोबतच शहरी भागातील विशेषत: मुंबईत झोपडपट्टी परिसरात कुपोषण मुक्तीची मोहीम प्रभावीपणं राबवण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महिला आणि बालविकास विभागाला दिल्या आहेत. सह्याद्री अतिथीगृहात या विभागाच्या पुढील १०० दिवसांत करायच्या कामांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला.
लाडकी बहिण योजना राबवताना प्रत्येक टप्प्याचा आढावा घेणाऱ्या “द ईनसाईड स्टोरी ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झालं. महिला आणि बाल विकास विभागाचे सचिव डॉ.अनुप कुमार यादव यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे आदी उपस्थित होते.
`