डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 31, 2024 3:21 PM | CM Devendra Fadnavis

printer

चित्रपट चित्रीकरणासाठी ‘एक खिडकी पद्धतीने परवानगी’ देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

सांस्कृतिक आणि सामाजिक प्रबोधनासोबतच सांस्कृतिक विभागाशी संबंधित सर्व बाबींमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत असल्यानं चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी ‘एक खिडकी पद्धतीने परवानगी’ देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुंबईत काल झालेल्या बैठकीत सांस्कृतिक कार्य विभागाच्या येत्या शंभर दिवसांच्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी  घेतला त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं त्रिशताब्दी वर्ष साजरं करण्यासाठी त्यांचं कार्य, सर्व शाळा आणि महाविद्यालयांपर्यंत पोहोचवावं यासाठी कार्यक्रमांचं आयोजन करून वर्षभराचा आराखडा तयार करण्याचे निर्देश देखील  त्यांनी यावेळी दिले. तसंच त्यांच्या महान  कार्यावर आणि जीवनावर एक चांगला व्यावसायिक चित्रपट तयार करावा, त्याला सरकारकडून अनुदान दिलं जाईल, असं फडणवीस यावेळी म्हणाले. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा