मुगल शासक औरंगजेबाची कबर हे संरक्षित स्मारक आहे, मात्र त्याचं उदात्तीकरण करू दिलं जाणार नाही, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. कुणाला आवडो की न आवडो औरंगजेबाची कबर हे संरक्षित स्मारक आहे, असं फडणवीस म्हणाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबाद इथली औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची मागणी गेले काही दिवस हिंदुत्त्ववादी संघटना करत होत्या. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे.
Site Admin | March 31, 2025 9:08 PM | CM Devendra Fadnavis
औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण करू दिलं जाणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
