जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सीसीआयने बंद केलेली कापूस खरेदी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. शेंदुर्णी सहकारी संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त अमृत ग्रंथ प्रकाशन आणि नूतन इमारतीचा पायाभरणी समारंभ फडणवीस यांच्या हस्ते झाला; यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांचे प्रामुख्याने वीज आणि पाण्यासंदर्भातील प्रश्न सोडवण्याला शासनाने प्राधान्य दिलं असून सौर पंपासाठी पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना पुढच्या १५ दिवसात आणि मागणी नोंदवल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला दोन महिन्याच्या आत जोडणी देण्यात येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
Site Admin | February 17, 2025 9:44 AM | CM Devendra Fadnavis
कापूस खरेदी सुरू करण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
