राज्यातल्या नद्यांचं प्रदूषण कमी करण्यासाठी नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी सातत्यानं तपासणी, रिअल टाईम मॉनिटिरिंग करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिल्या आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगानं आढावा बैठक झाली. या बैठकीत ते बोलत होते. छोट्या छोट्या स्त्रोतांचं प्रदुषण कमी होण्यासाठी ग्रामीण भागात जनजागृती अभियान राबवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
मत्स्य व्यवसाय विभागाच्या शंभर दिवसांच्या नियोजनाचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी आज घेतला. गोड्या पाण्यात मासेमारी वाढवणं गरजेचं असून यात तसाठी धोरण निश्चित करावं, तसंच मत्स्यबीज मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होण्यासाठी धोरण तयार करावं अशा सूचना त्यांनी दिल्या.
राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात पाळीव प्राण्यांसाठी रुग्णालय उभारण्याच्या सूचनाही त्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या आढावा बैठकीत दिल्या. या संबंधात प्रस्ताव तयार करावा तसंच पशुसंवर्धन विभागातली रिक्त पदे भरण्यासंदर्भातही कार्यवाही पूर्ण करावी अशाही सूचना फडणवीस यांनी यावेळी दिल्या. पशुधनवाढीसाठी गायींच्या पैदासीची यंत्रणा उभारणे, पैदासीच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सहभाग घेणे, चारा व्यवस्थापन अशा विविध सूचना फडणवीस यांनी केल्या.