या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्य पोलिस दलाच्या 90 टक्के कर्मचाऱ्यांना नव्या कायद्यांबाबत प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती वार्ताहरांना दिली. सात वर्षांपेक्षा जास्त जुन्या खटल्यांच्या तपासासाठी राज्य सरकारनं 27 न्यायवैद्यकशास्त्र व्हॅन्स तैनात केल्या असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
नव्या कायद्यांतर्गत, न्यायालयांमध्ये ऑनलाईन प्रणाली स्थापित केली असली तरीही न्यायालये, न्यायवैद्यक प्रयोगशाळेत समर्पित व्यवस्था उभारावी लागणार असून त्यावर काम सुरू असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. तारखांवर तारखा हे चित्र बदलवून कमी वेळात केस निकाली काढण्यासंदर्भात प्रयत्न केले जाणार असल्याचंही फडवणीस वार्ताहरांशी बोलताना म्हणाले.