डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

February 9, 2025 2:55 PM | anandvan | CM

printer

आनंदवन प्रकल्पाला 10 कोटी रुपयांचा निधी देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

बाबा आमटेंनी सुरू केलेल्या आनंदवन या प्रकल्पाला दहा कोटींचा कॉर्पस फंड देण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेद्र फडनवीस यांनी केली. आनंदवनात महारोगी सेवा समितीच्या पंचाहत्तर वर्षपूर्ती कृतज्ञता मित्र मेळाव्यात ते बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०२७ पर्यंत देश कुष्ठरोगमुक्त करण्याचं ठरवलं आहे. आनंदवनसारख्या समाजसेवी संघटनांच्या मदतीनेच हेे साध्य करता येईल असं ते म्हणाले.

 

कुष्ठरोग्यांची संख्या लक्षणीयरित्या घटली असली तरी मोठ्या प्रमाणावर अजून कार्य करायचं बाकी आहे असं नमूद करत आनंदवनात पाचशे जणांसाठी निवासी रुग्णकेंद्र उभारण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. रुग्णालयाला देण्यात येणारं अनुदान प्रतिरुग्ण २२०० वरुन ६ हजार पर्यंत तर पुनर्वसनासाठीचंही अनुदान दोन हजार पासून ६ हजार पर्यंत वाढवल्याची घोषणाही फडणवीस यांनी यावेळी केली. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंतही यावेळी उपस्थित होते. दिव्यांगांसाठी देशातल्या पहिल्यावहिल्या कौशल्य विकास केंद्राची स्थापना आनंदवनात करण्याची घोषणा यावेळी केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा