हिमाचल प्रदेशातील शिमला, मंडी आणि कुल्लू मधल्या नुकत्याच झालेल्या ढगफुटीच्या घटनांमधील बेपत्ता व्यक्तींचा शोध आज पाचव्या दिवशीही सुरूच आहे. आतापर्यंत राज्यातील विविध ठिकाणांहून १५ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर ४० लोक अजूनही बेपत्ता आहेत. याशिवाय, कुल्लू जिल्ह्यातील मलानामधून १५ स्थानिक रहिवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
उत्तराखंडमध्ये रुद्रप्रयाग जिल्ह्यातल्या केदारनाथ धामसह केदारघाटीच्या आपत्तीग्रस्त भागात पाचव्या दिवशी मदत आणि बचाव कार्य सुरूच आहे. आतापर्यंत १० हजारांहून अधिक लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.