मुंबई आणि परिसरातल्या विविध भागांमधे या महिन्यात तपमानात १३ अंश सेल्सिअसपर्यंत तफावत दिसून आल्याचं रेस्पायरर लिव्हिंग सायन्सेसनं जारी केलेल्या विश्लेषणात नमूद केलं आहे. १ ते २२ मार्च या कालावधीत वसई पूर्व आणि घाटकोपरमधे सरासरी ३३ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. तर याच काळात पवईमधे सरासरी २० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान होतं. हा फरक १३ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. त्यावर स्थानिक बाबी विचारात घेऊन उपाययोजना केली पाहिजे, अशी अपेक्षा या विश्लेषणात व्यक्त केली आहे. तापमानातला हा फरक केवळ अभ्यासाचा विषय नाही, तर उच्च उष्णतेचे ताण आणि संबंधित आरोग्याचे प्रश्न त्यातून उद्भवतात, असं रेस्पायररचे संस्थापक रौनक सुतारिया यांनी सांगितलं.
Site Admin | March 31, 2025 9:00 PM | climate change | IMD | Mumbai
मुंबई आणि परिसरातल्या विविध भागांमधे या महिन्यात तपमानात 13 अंशपर्यंत तफावत
