महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षेचं अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा पुढच्या वर्षी ११ फेब्रुवारी ते १८ मार्च तर दहावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १७ मार्च या काळात घेतली जाणार आहे. तत्पूर्वी बारावीची प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी या काळात घेतली जाईल तर दहावीची प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा ३ ते २० फेब्रुवारी या कालावधीत होईल. परीक्षेचे विषयनिहाय सविस्तर वेळापत्रक २१ नोव्हेंबरपासून राज्य मंडळाच्या www.mahasscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाची परीक्षा १५ फेब्रुवारी पासून सुरु होणार असल्याची घोषणा आज सीबीएसईनं केली. दहावी बोर्डाच्या परीक्षा १८ मार्चला तर बारावीच्या परीक्षा ४ एप्रिल रोजी संपतील.